मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी भक्त आहेत. स्वामी सेवेकरी आहेत आपण मनापासून श्रद्धेने स्वामींची सेवा करीत असतो. स्वामी सदैव आपल्या पाठीशी देखील उभे राहतात. संकटातून बाहेर काढतात. स्वामींचे अनेक अनुभव अनेकांना आलेले आहेत. तर असाच एक अनुभव आपण अभिजीत काळे यांना आलेला पाहणार आहोत. म्हणजेच भूतबाधा आणि स्वामी चमत्कार असा यांचा थरारक अनुभव आहे आणि हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेऊयात.
नमस्कार मी अभिजीत काळे मी एसटी ड्रायव्हर आहे आणि माझी त्यावेळी नाईट ड्युटी चालू होती आणि रात्रीचे साडेदहा वाजले होते आणि आम्ही रात्रीची ड्युटी करत होतो मी आणि माझा कंडक्टर हा बसमध्ये होतो. नंतर एका एसटी स्टँड वरती गेल्यानंतर तिथे शेकोटी पेटवलेली आम्हाला दिसली. म्हणजे एसटी स्टँडच्या डाव्या बाजूला शेकोटी पेटवलेली होती आणि ड्रायव्हर कंडक्टर हे शेकोटी जवळ बसलेले होते. कारण त्यावेळेस हिवाळ्याचे दिवस होते आणि नंतर मग आम्ही देखील बस स्टॅन्ड वरती गेल्यानंतर थोडा वेळ शेकोटीपाशी बसलो आणि त्यावेळेस सगळ्या एसटी कंडक्टरची बोलण्याची चर्चा होती की वडगाव पासून समोरच गाव असलेल्या नगरमध्ये एक म्हातारे आजोबा वारलेले आहेत.
ते अघोरी बाबांचे भूत फिरत आहे आणि त्या गावांमध्ये चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. परंतु ती चोरी नसून अघोरी बाबाच भूत फिरत आहेत असे ते म्हणत होते. मग त्यांच्या या बोलण्यावरती मला जरास हसू आलं. कारण मी अंधश्रद्धा वगैरे काहीही मानत नव्हतो. मग नंतर आमचं चहा पिणे वगैरे झाल्यानंतर जेमतेम पावणे बारा वाजले होते आणि आम्ही मग पावणे बारा वाजता वडगाव पर्यंत आलो.
त्यावेळेस एस टी मध्ये थोडेसे प्रवासी होते आणि मी आणि कंडक्टर होतो आणि ज्यावेळेस मी एसटी चालवत होतो. त्यावेळेस एकदम खूपच अंधार पडलेला होता काळोख होता आणि एकदम थोडीफार थंडी देखील होती. बस चालत असताना रस्त्याच्या कडेला एक चिंचेचे झाड होते आणि त्या चिंचेच्या झाडाखालून आमची बस चालत होती आणि रस्त्याकडे एक भिंत होती.
आणि काही अंतरावर मला असे दिसले की एक कोणीतरी त्या भिंतीवर बसलेले आहेत. वयस्कर आजोबा ते होते. आणि त्यांचे पाय मात्र इतके मोठे आहेत की ते पाय रस्त्यावर आलेले होते. हे पाहून मला खूपच धक्का बसला आणि एकदमच मी गाडी थांबवली. एकदम कंडक्टर म्हणाला की गाडी का थांबवलीस आणि कंडक्टर पुढ आला. तर मी त्याला तो समोर बसलेले आघोरी बाबत दाखवले. त्यानंतर तो देखील खूपच घाबरला. प्रवासी सर्वजण म्हणू लागले की गाडी का थांबवली? तर आम्ही त्यांना सांगितलं की एसटी बंद पडलेली आहे म्हणजे चाक खराब झालेले आहे थोड्या वेळाने आपण निघूया.
कारण प्रवाशांना भीती घालवण्यासारखे होणार म्हणजे प्रवासी खूपच घाबरणार म्हणून आम्ही काही सांगितले नाही. ते अघोरी बाबा इतके विचित्र होते म्हणजेच शेकोटीजवळ जे लोक बोलत होते की अघोरी बाबांचे भूत म्हणजे हे आघोरी बाबांचे भूतच होते. एकदम लालबुंद असा चेहरा होता आणि ते विचित्र दिसत होते त्यांचे पाय इतके मोठे होते की ते रस्त्यावर आलेले होते. मला त्यावेळेस काहीच कळेनासे झाले की आता गाडी चालवायची की बंद करायची हेच काहीही कळेना झालेले.
मग थोड्यावेळाने प्रवासी मधील एक आजोबा म्हणाले त्यांनी देखील तो अघोरी बाबा दिसला आणि ते म्हणाले की काही नाही होत. तू गाडी चालव माझ्यापाशी चामड्याची चप्पल आहे चामड्याची चप्पल पाशी कोणतेही भूत येत नाहीये. असं मी लहानपणी देखील ऐकलं होतं. परंतु आम्ही त्या आजोबांना शांत केल आणि बसवलं आणि एकदम नंतर मी पाहिलं तर ते आघोरी बाबा तिथून गायब झाले होते.
मग नंतर मी गाडी चालवला सुरुवात केली आणि नंतर एकदम माझे लक्ष पाठीमागच्या सीटवर असलेल्या कंडक्टरच्या सीटवर गेले तर तिथे पाहतो तर कंडक्टर साईटला ते अघोरी बाबाचे भूत बसलेले मला दिसले. मला खूपच भीती वाटू लागली आणि त्या आंघोरी बाबांनी माझ्या जवळच असणारा आरसा देखील फोडला. त्यावेळेस मला मात्र खूपच भीती वाटू लागली. मी कंडक्टरला सांगणार की तुझ्यासाठी बाबांचे भूत बसलेल आहे परंतु माझ्या तोंडातून शब्दच फुटेना.
नंतर काही वेळाने नंतर परत मागे पाहिले. तर ते आघोरी बाबांची भूत गायब झालेले होतं. नंतर थोड्या वेळाने मी काही अंतरावर गेल्यानंतर बस थांबवली आणि बसमधून खाली उतरून मी वॉशरूम ला जाऊन आलो आणि वॉशरूम करून मी परत बसमध्ये येणार तोपर्यंतच माझ्या पाठीमागे ते आघोरी बाबाचे भूत उभे राहिले. त्यावेळेस मला तरी काही सूचेना.
माझे हात पाय कापू लागले आणि ते आघोरी बाबांचे भूत इतकं विचित्र होतं लालबुंद होते. ते एकदम वाईट नजरेने म्हणजे रागाने माझ्याकडे पाहत होते आणि ते माझ्या दिशेने चालायला लागल्यानंतर मला खूपच भीती वाटू लागले. त्यावेळेस मात्र बसमधून एक चामड्याचे चप्पल माझ्या दिशेने फेकले गेले आणि ते माझ्यासमोर पडले.
चामड्याची चप्पल पाहताच ते अघोरी बाबाचे भूत गायब झालं व त्यावेळेस मी बसमध्ये आल्यानंतर ते जे बस मध्ये आजोबा होते त्यांचे मी आभार मानले की तुम्ही चप्पल माझ्या दिशेने फेकले. तर ते आजोबा मला म्हणाले की, आभार मानायचे तर तुझ्या पत्नीचे मान. कारण तुझी पत्नीच मला खूपच तुझ्यासाठी विनवणी करत होती. भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असे ते म्हणाले आणि ते आजोबा गायब झाले.
मग त्यावेळेस मला समजले की, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तर स्वामी समर्थांचे आहे आणि त्यावेळेस मग मला खात्री पटली की माझी बायको स्वामी समर्थांची पूजा करते आणि मी आजपर्यंत कधीच देवाला उदबत्ती वगैरे काहीच लावले नाही. माझी श्रद्धाच देवांवर नव्हती.
माझ्या मनाला खूपच वाईट वाटल आणि त्यावेळेस मी हंबरडा फोडला. नंतर मी माझ्या पत्नीला फोन केला आणि त्यावेळेस तिला म्हणालो की तू अजून झोपली नाहीस. तुझ्यामुळेच माझे प्राण वाचले असे म्हणालो आणि मी फोन ठेवला. नंतर दुसऱ्या दिवशी माझी नाईट ड्युटी संपली आणि मी घरी गेलो. त्यावेळेस सगळे सर्व हकीकत मी माझ्या बायकोला सांगितले आणि त्यावेळेस मला समजले की मी ड्युटीवर आल्यानंतर माझी बायको स्वामींची सेवा करत होती.
आणि तेव्हापासून मात्र मी मात्र स्वामींच्या सेवेमध्ये आलो. कारण त्या रात्री मला वाचवलं ते स्वामींनीच वाचवलं होतं आणि माझी पत्नी ही स्वामीभक्त होती आणि स्वामीच माझ्या पाठीशी उभे राहिले होते आणि तेव्हापासून मी मात्र स्वामींच्या प्रतिमेची दररोज पूजा अर्चना न चुकता करतो आणि नंतर आम्ही सर्व कुटुंबीय एक दिवस अक्कलकोटला देखील जाऊन आलो. कारण मी आज होतो तो फक्त स्वामींच्या मुळेच होतो.