90% लोक देवपूजा करते वेळी करतात या चुका …… म्हणून त्यांना देव पावत नाही पहा कोणत्या आहेत या चुका ?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, हिंदू धर्मानुसार आपला प्रत्येकाच्या घरामध्ये देव्हारा हा असतोच. या देव घरामध्ये आपण आपल्या आराध्याची म्हणजेच आपण ज्या देवावर खूप मनोभावाने श्रद्धा आहे किंवा ज्या देवाला आपण आपले आराध्य मानतो. त्याचबरोबर आपले कुलदैवत ईस्ट दैवत यांची पूजा करत असतो. ही पूजा आपण रोज नित्यनेमाने करत असतो. त्यांची भक्ती भवानी पूजा चर्चा करत असतो. परंतु आपल्या हातून अशा काही चुका घडतात की ज्या चुका आपल्याला माहीतच नसतात आणि आपण या चुकीच्या पद्धतीमुळे देवपूजा करतो आणि त्याचे फळ आपल्याला मिळत नाहीत.

 

व आपल्या घरामध्ये सतत भांडणे, वाद विवाद, घरामध्ये व्यक्तीचे आरोग्य सतत बिघडत राहते, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही. यावर आपल्या मनात असे येते की आपण इतके देवाच्या आराधना करतोय इतकी पूजा करतो. तरी देखील आपल्याला त्याचे फळ का मिळत नाही आणि आपण देवालाच त्याचा दोष देऊ लागतो. की इतकी करून देखील आपल्याला त्याचे फळ देत नाही. आज आपण या लेखांमध्ये देवपूजा करताना कोणती कामे करू नयेत? ज्यामुळे आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

पायामध्ये जोडे किंवा चप्पल घालून कधीही देवाला नमस्कार करू नका. देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नका. देवाचे नुसताच दर्शन घेऊ नका तर त्याला हात जोडून नमस्कार करावे. डोक्यावर टोपी घालून देवाला नमस्कार कधीही करू नये. एखाद्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालताना गप्पा मारत कधीही प्रदक्षिणा घालू नये. देवासमोर कधीही पाय पसरून बसू नये.

 

देवासमोर उभारून इतर व्यक्तींना कधीही वंदन करू नका. त्यामुळे देवाचा अपमान केला सारखे होते. देवा समोर कोणत्याही प्रकारचे धूम्रपान किंवा व्यसन करू नये. देवाची पूजा करत असताना इतरांसोबत गप्पा मारत पूजा करू नये. पूजा करीत असताना मन हे एकाग्र असावे. अंधारामध्ये देवाला हात लावू नका.

 

देवाला गंध आणि फुले वाहण्याआधी धूप आणि दीप लावू नका. आधी देवाला फुले व्हावे, देवाला गंध लावायचे मगच धूप दिप ओवाळावे. आंघोळ केल्याशिवाय कधीही देवपूजा करू नये. देवपूजा करण्यात आली प्रथम आपल्या कपाळी भस्म लावावे व मगच पूजा करावे. त्याचबरोबर देवपूजा करण्याआधी आपण कोणत्याही मांसाहाराचे सेवन केलेले नसावे. जर आपण मांसाहार केला असेल तर आपण देवपूजा करू नये.

 

देवाला फुले वाहत असताना ती ताजी असावीत. सुकलेली नसावी. त्याचबरोबर फुल हे सर्व देवासमोर व्यवस्थित पत्ता ठेवावे. ती कशी पण ठेवू नये. त्याचबरोबर देवपूजा करत असताना मलमूत्र त्याग करण्यासाठी जाऊ नये. जर जाण्याची फारच गरज असेल तर जाऊन परत आंघोळ करून मगच पूजा करावी. अशाप्रकारे आपण या काही चुका करत असतो की ज्यामुळे आपल्याला आपण करत असलेले पूजेचे फळ हे मिळत नसत.

 

अशाप्रकारे या चुका तुम्ही देखील करू नका नक्कीच तुम्हाला तुम्ही करत असलेल्या पूजेचे फळ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *