30 लाखांचे कर्ज फक्त 2 महीने हे ऐकले आणि चक्क 3 कोटी मिळाले.. अंगावर शहारे आणणारा सत्य स्वामी अनुभव…!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो स्वामी महाराजांची लीला आघात आहे. ते आपल्या भक्ताला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडत नाही. ज्या वेळेला त्यांच्या भक्तांना त्यांची गरज असते त्यावेळेला ते नेहमीच सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतात. प्रत्येक संकटातून ते त्यांना बाहेर काढत असतात व योग्य तो मार्ग देखील दाखवत असतं. स्वामी सेवा केलेली कधीही वाया जात नाही. त्यांचे फळ आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधी मिळतेच. तसाच एक सत्य स्वामी अनुभव आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

आजच्या आपण स्वामी अनुभवाची माहिती जाणून घेणार आहोत तो एका ताईंना आलेला अनुभव आहे. या ताई मूळच्या नागपूरच्या होत्या. परंतु त्यांच्या बाबांच्या नोकरीमुळे त्या मुंबईतील राहिल्या. जवळजवळ त्या पंधरा वर्षाच्या असल्यापासून स्वामी सेवा करत होतो. स्वामी सारामृतांची वाचन करत असत. स्वामी मंत्राचा जप करत. अशाप्रकारे त्यांची स्वामी महाराजांवर अत्यंत भक्ती होते. त्यांचे वडील हे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये नोकरीसाठी लागले होते. त्या त्यांचे वडील एकटेच मुंबईमध्ये राहत होते आणि या ताई व त्यांची मोठी बहीण आणि आई असा त्यांचा कुटुंब नागपूर मध्ये राहत होता.

 

नागपूर मध्ये त्यांची पंधरा एकर शेतजमीन होती. त्यामुळे ते शेतामध्ये खूप काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांचे आई खूपच कष्टाळू होती आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांची बहिण व त्या देखील शेतात सर्व कामे शिकल्या होत्या व शेतातच सर्व कामे करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या बाबांना मुंबईमध्ये नोकरी लागून आठ वर्ष झाल्यानंतर त्यांनी नागपूर वरून मुंबईला स्थलांतर केले. त्यांचे परिस्थिती खूपच कष्टाची होती आणि गरीब देखील होती. त्यांना सतत असे वाटत होते की आपली परिस्थिती सुधारावी आणि त्यासाठीच ते स्वामी महाराजांकडे प्रार्थना देखील करत होता.

 

त्यांच्या घरामधील देवारांमध्ये फक्त स्वामी महाराजांची एकच मूर्ती होती आणि त्यांनाच ते अत्यंत भक्तीने त्यांची पूजा करत होते. त्यांचे बाबा सोडले तर त्या तिन्हीही जणी स्वामी महाराजांच्या भक्त होत्या आणि त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये एकदा तरी त्यांच्यापैकी एक जण तरी गुरुचरित्राचे व सारामृत आचे पारायण करत होत्या. एके दिवशी त्यांची शेतजमीन ही नागपूरच्या होणाऱ्या हायवे मध्ये जाणार होती हे त्यांना कळताच त्यांना खूप आनंद झाला. कारण सरकारकडून त्यांना त्या जमिनीचा मोबदला मिळवून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा त्यांचा समज झाला होता. परंतु त्यांच्या चुलत्यांनी त्या जमिनीचा सातबारा बळकावून घेतला होता. त्यामुळे त्यांना त्याचे पैसे मिळाले नाही व कोर्टामध्ये केस सुरू झाली. घरामध्ये त्यांचे बाबा एकटेच कमवते असल्यामुळे खूप हालाखीचे दिवस निर्माण झाले. कोर्टामध्ये केस चालू होती त्या वेळेला वकिलांना पैसे देण्यासाठी त्यांच्या बाबांनी कर्ज काढले.

 

त्या कर्जत काढलेल्या टायमांमध्ये त्यांचे आई अचानकपणे आजारी पडली आणि त्यांच्या आजारपणासाठी दोन लाख रुपये खर्च झाले. त्यांच्या बाबांनी आणि थोडे कर्ज काढून वकिलांना पैसे दिले. प्रत्येक महिन्याला वकिलांना पैसे द्यावे लागत असत व कोर्टामध्ये देखील जावे लागत होते. याच कालावधीमध्ये त्यांच्या मोठ्या बहिणीला खूप चांगले स्थळ आले हे स्थळ हातातून जाऊ नये यासाठी त्यांनी बहिणीचा लग्न करण्याचा विचार केला व त्यांच्या बाबांनी आणखीन कर्ज काढून त्यांच्या बहिणीचे लग्न करून दिले. अशा या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 30 लाख रुपयांचे कर्ज त्यांना झाले होते. अशावेळी त्यांच्या बाबांना काय करावे हे सुचत नव्हते. त्यांच्या बाबांच्या मनात सतत आत्महत्येचा विचार येत होता.

 

या ताई खूप बेचैन झाल्या होत्या. त्यामुळे त्या सतत स्वामी समर्थांचे नामस्मरण करत होत्या. त्या ताईने सलग दोन महिने स्वामींचा तारक मंत्र व ऐक्य मंत्र या मंत्राचे सतत श्रवण सुरू केले पारायण केले. स्वामींचे नामस्मरण केले, स्वामी समर्थ नामाचा जप केला. अशा प्रकारचे अनेक स्वामी सेवा त्या करत होत्या. त्यांना ना खायचे भान होते ना प्यायचे भान होते. या दोन महिन्यात जवळजवळ त्यांचे सात किलो वजन इतके कमी झाले होते. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की कोर्टाचा निकाल हा लवकरात लवकर लागून आपली परिस्थिती सुधारावी. आपल्या बाबांच्या मनावरील झालेला परिणाम दूर व्हावा व आपले चांगले दिवस यावे. याचं विचारांनी त्या खूप खचल्या होत्या.

 

एके दिवशी गुरुवारच्या दिवशी त्यांना वकिलांचा फोन आला. त्या पूजा करत होत्या. पूजा झाल्यानंतर त्यांनी वकिलांना परत फोन केला. त्या वेळेवर वकिलांनी त्यांना सांगितले की कोर्टाचा निकाल लागला आहे आणि तो तुमच्या बाजूने लागला आहे. हे ऐकताच त्या खूप खुश झाल्या. पुढच्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या अकाउंट वर पैसे आले आणि त्यांनी त्यांच्या वरती असलेले सर्व कर्ज फेडले. जवळ जवळ या दोन महिन्यांमध्ये केलेल्या सर्व सेवेमुळे त्यांना हे फळ मिळाले आहे असे त्यांना वाटले. स्वामी महाराजांनी त्यांना त्यांच्या संकटामध्ये साथ देऊन त्यांना संकटातून मुक्ती केली त्यांच्याजवळ आता तीन कोटीची मालमत्ता आहे.

 

अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये हा एक स्वामी अनुभव आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *