या १२ लोकांवर कधीच विश्वास ठेऊ नका कधीच तुम्ही संकटात सापडणार नाही ..!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक असतात. पण प्रत्येकांवर विश्वास ठेवलाच पाहिजे असे नाही. परंतु काही लोक असे असतात की डोळे झाकून च्या व्यक्तींवर विश्वास ठेवतात व त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. म्हणूनच या लेखामध्ये आपण कोणत्या बारा लोकांवर विश्वास अजिबात ठेवू नये याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

एका पर्वतावर एक गिधाड राहत होता. जो म्हातारा तर होताच, त्याचबरोबर तो आंधळा सुद्धा होता आणि म्हणूनच त्या झाडावर राहणारे सर्व पक्षी थोडं थोडं करून त्या म्हाताऱ्या गिधाड्याला अन्न देत असत. म्हातारा गिधाड सुद्धा त्याच्या जीवनातील अनुभव त्या पक्षांना सांगून त्या सर्व पक्षांचा तो एक माननीय आणि आदरपूर्वक असा पक्षी बनला होता. आणि अशा प्रकारे त्या झाडावरील वातावरण खूपच सुखमय होते.

 

एके दिवशी एक बोका त्या पक्षांच्या पिल्लांना खाण्यासाठी, त्या झाडावर चढला. बोक्याला पाहून सर्व पक्षी घाबरले व जोरजोरात ओरडू लागले. सर्व पक्षांचा आवाज ऐकून गिधाडाने विचारलं, कोण आहे?गिधाडाचा आवाज ऐकून तो बोका घाबरला, तो विचार करू लागला, मी लालसेपोटी हे कुठे आलो आहे. इथे तर हा भयंकर मोठा गिधाड आहे. याच्यासमोर माझे प्राण बिलकुल टिकणार नाहीत. जर याला समजलं, की मी इथे पक्षांची पिल्ले खाण्यासाठी आलो आहे, तर मग हा गिधाड मला सोडणार नाही.

 

मित्रांनो मृत्यू समोर पाहून त्या बोक्याने कपटी बुद्धी वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्या गिधाड्याला प्रणाम करत म्हणाला, हे गिद्ध महाराज, मी एक बोका आहे. बोक्याचं नाव ऐकताच, गिधाड त्याच्यावर ओरडला आणि त्याला म्हणाला, है दृष्ट, तू इथे येण्याची हिंमत कशी केलीस. तुला माहित नाही का, या वृक्षाची सर्व काळजी मी घेतो. गिधाड ओरडल्यावर तो बोका खूपच घाबरला. त्याने ताबडतोब त्याच्या कपटबुद्धीचा वापर केला आणि एकदम तो गिधाड्याच्या चरणात पडला आणि म्हणाला, महाराज माझं म्हणणं ऐकून तर घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही मला माराव, तर तुम्ही खुशाल मला मारू शकता.

 

गिधाड म्हणाला, है दृष्ट मांजरा, तू इथे कशासाठी आला आहेस? बोका म्हणाला, महाराज मी नित्यनेमाने गंगास्नान करतो. आता मी मास खाणे सोडून दिले आहे. मी माझ्या इंद्रियांवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे आणि मी ब्रह्मचार्य व्रताचे सुद्धा पालन करतो. मी अनेक पक्षांकडून तुमच्याबद्दल खूप कौतुक ऐकले आहे आणि मी तुमच्याकडे धर्माच्या चार गोष्टी ऐकण्यासाठी आलो आहे. महाराज मी तुमचा सेवक आहे, श्रद्धा भावनेने मी तुमच्याजवळ आलो आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमची कृपा माझ्यावर ठेवा.

 

गिधाड म्हणाला, है बोक्या तू तर मांसभक्षी आहेस आणि या झाडावर पक्षांची छोटी छोटी पिल्लं राहतात. मी त्या सर्व पिल्लांचे रक्षण करतो आणि म्हणूनच तू इथून निघून जा. तुझ्यात आणि माझ्यात मैत्री होऊच शकत नाही. असं म्हणतात, की ज्याचं कपटी वागणं आपल्याला माहित आहे, त्याच्यासोबत मैत्री करणे हे नेहमीच धोकादायक असते. बोक्याने गिधाडाला विश्वास देण्यासाठी सांगितलं, महाराज, मी धर्मात्मा माणसांकडून ऐकल आहे, की अहिंसाच सर्वात मोठा धर्म आहे.

 

आणि म्हणूनच मी मांसभक्षण करणे सोडून दिले आहे. मी फक्त फळ खाऊनच माझा उदरनिर्वाह करत असतो. आज मला तुमचे दर्शन झाले त्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे. कारण सत्पुरुषांचा दर्शन खूपच नशिबाने मिळतो. कृपया तुम्ही मला तुमच्या चरणांमध्ये राहण्याची जागा द्या. अशा प्रकारे त्या बोक्याच्या गोड गोड बोलण्यावर गिधाडाने विश्वास ठेवला आणि त्याला त्याचा मित्र बनवला आणि त्याच दिवसापासून तो बोका त्याच झाडावर राहू लागला. काही दिवस असेच निघून गेले व त्यानंतर तो बोका गिधाडाचा खूपच जास्त विश्वासू बनला. इकडे पक्षांची पिल्ले पाहून बोक्याच्या तोंडामध्ये पाणी सुटत होतं.

 

मांसभक्षी असलेला त्याचा स्वभाव त्या पक्ष्यांच्या पिल्लांना खाण्यासाठी त्याला प्रवृत्त करत होता. हळूहळू त्याला हे सुद्धा माहीत झालं होतं, की हा गिधाड आंधळा आहे आणि त्यामुळे हा मला काय नुकसान पोहोचू शकतो. मित्रांनो एके दिवशी सर्व पक्षी अन्नाच्या शोधासाठी बाहेर गेले होते आणि त्याच वेळेत तो बोका पक्षांच्या पिल्लांना खाऊ लागला. आणि जेव्हा संध्याकाळी पक्षी परत यायचे, तेव्हा त्यांना त्यांची पिल्ले दिसायची नाहीत. तेव्हा त्यांना खूपच वाईट वाटायचं. खूपच दुःख वाटायचं

 

पक्षांच्या सर्व पिल्लांना हळूहळू त्या बोक्याने खाल्ले. त्या पिल्लांना खाल्ल्यानंतर त्यांची जी हाडं असतील, ती तो गिधाडाच्या घरट्यात ठेवायचा. आंधळा असल्यामुळे गिधाडाला त्या बोक्याचं हे दृष्ट कर्म दिसत नव्हतं. एके दिवशी सर्व पक्षी त्यांच्या पिल्लांच्या दुःखामुळे त्यांना शोधत शोधत गिधाड्याच्या घरट्यापर्यंत पोहोचले. तिथे त्यांना तो बोका तर दिसला नाही, कारण तो तिथून पळून गेला होता. परंतु त्या सर्व पक्षांना गिधाडाच्या घरट्यामध्ये त्यांच्या पिल्लांची हाडे दिसली. तेव्हा हे पाहून त्यांना खूपच राग आला.

 

ते सर्व पक्षी गिधाडाला त्यांच्या पिल्लांचा हत्यारा समजू लागले आणि त्यामुळे रागारागाने त्या सर्व पक्षांनी मिळून, त्या गिधाडाला चोचीनी टोचून टोचून मारून टाकले. एका दृष्ट मांजराला सोबत ठेवल्यामुळे त्या गिधाडाला त्याचे प्राण गमवावे लागले आणि म्हणूनच म्हणतात, की दृष्ट व्यक्तीची सोबत नेहमीच धोकादायक असते. बिचारा गिधाड सर्व पक्षांच्या पिल्लांची रक्षा करायचा, परंतु त्या हिंसक बोक्याची संगत मिळाल्यामुळे, अनेक पक्षांची पिल्लं मारली गेली आणि अखेर तो गिधाड सुद्धा मारला गेला.

 

असं म्हणतात, की जो मंदबुद्धी असतो, जो मित्राच्या मनातील वाईट भाव न समजून घेताच, त्याच्यासोबत मित्रता करतो. तर अशावेळी त्याचा नेहमीच घात होत असतो. नेहमीच कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. पत्नी, पुत्र, भाऊ किंवा सल्लागार कोणाचाही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. कारण, सर्वांनाच धन, स्त्री आणि राज्याचा लोभ असतो आणि जरी कोणी विश्वास पात्र असेल, तरी तो जो काही कार्य करत असेल, तर त्याच्यावर गुपचूप लक्ष ठेवायला हवे

 

असे म्हणतात, की मूर्वांना समजावून सांगणे, म्हणजे आपल्याच क्रोधाला वाढवने आहे. सापांना दूध पाजणे, म्हणजे विषाला वाढवणे आहे, त्याचा अमृत होत नाही. नीच माणसांसोबत जवळीतपणा, नेहमीच संकट वाढवत असतात. विद्वान पुरुष म्हणतात, जे पापी दृष्ट माणसांचा त्याग न करता त्यांच्यासोबत राहतात, अशा सज्जन पुरुषाला सुद्धा त्यांच्यासोबतच दंड प्राप्त होतो. ज्याप्रमाणे सुक्यासोबत ओले जळते, त्याचप्रमाणे सज्जन पुरुषांना देखील दृष्ट माणसांच्या सोबत कठीण दंड भोगावे लागतात.

 

असं म्हणतात की ह्या बारा लोकांवर कधीच विश्वास करू नये. नंबर एक, स्त्री. नंबर दोन, धुर्त. नंबर तीन, आळशी. नंबर चार, भित्रा. नंबर पाच, रागीट, नंबर सहा, ज्याला तो पुरुष असल्याचा अभिमान आहे असा. नंबर सात, चोर. नंबर आठ, उपकाराची जाण नसलेला. नंबर नऊ, नास्तिक. नंबर दहा, नीच. नंबर अकरा, हिंसक आणि नंबर बारा, निर्दयी. मित्रांनो, जो या बारा लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतो, तो एक ना एक दिवस संकटात नक्कीच सापडतो.

 

अशाप्रकारे कोणत्या बारा लोकांवर आपण विश्वासाची बात ठेवू नये याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *