मित्रांनो, आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. भारताच्या विविध राज्यात आजही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. आपले बहुतांश सण हे शेतीशी संबंधीत आहेत. मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.
मकर संक्रांती हा आनंदाचा, उत्सवांचा, मेजवानीचा आणि संपूर्ण देशात आणि जगभरातील सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांचा काळ आहे. तसेच माझ्या परिसरात सक्रांत म्हणून ओळखले जाते. हे धनु राशीपासून मकर राशीत सूर्याचे संक्रमण चिन्हांकित करते. हा सण हवामानातील बदल दर्शवणारा असला तरी तो हिवाळा संपतो आणि वसंत ऋतूची सुरुवात देखील करतो. शिवाय, मकर संक्रांती सूर्यदेव च्या दक्षिण गोलार्धापासून उत्तर गोलार्धापर्यंतचा प्रवास साजरा करते, ज्याला उत्तरायण म्हणून ओळखले जाते
मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 14 जानेवारी 2025 ला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळा रंगाला महत्त्व आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठलातरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते, त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसतं.
देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते. पण त्यापूर्वी यंदा काळा रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहेत, ते पाहूयात. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळा रंगाच्या साडीशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगांची साडी नेसू शकतात. 2025 मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन येणार आहे.
त्यामुळे यंदा पिवळ्या रंगांची साडी नेसायची नाही. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला.
अशा प्रकारे मकरसंक्रांतीला या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका .