पायातील पैंजण आणि घरातील पिवळे आणि काळे पडलेले चांदीचे दागिने न हात लावता चमकवा फक्त दोन मिनिटांत?

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येकाला सोनं किंवा चांदीचे दागिने घालण्याची आवड असते. याव्यतिरिक्त लोकं आर्टिफिशियल दागिने देखील घालतात. परंतु ओरिजिनल असो किंवा आर्टिफिशियल प्रत्येक दागिना एका कालावधीनंतर काळपट पडत जातो. सोन्या-चांदीचे दागिने काळपट पडल्यानंतर त्यांना स्वच्छ करण्यासाठी सोनाराकडे घेऊन जायला लागते.

 

मात्र, सोनाराकडे घेऊन गेल्यानंतर खूप खर्चही होतो. पण आपण चहापत्तीचा वापर करून दागिने स्वच्छ करू शकता. आता तुम्ही म्हणाल चहापत्तीच्या वापराने दागिने स्वच्छ होऊ शकतात का? आपण चहापत्तीच्या वापराने घरातील सोन्या, चांदीचे दागिने स्वच्छ करू शकता ते कसे करावे? याची माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

चांदी स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात चहापत्ती घाला. ही चहा पत्ती एक चमचा याप्रमाणे घालावे. जर तुम्ही वापरलेलीच आहे तर ती तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी आपणाला चहा बनवलेली जी चहापत्ती असते स्वच्छ धुऊन परत पाण्यात उकळत ठेवावी. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा डिटर्जेंट घालून मिक्स करा. आणि थोडे गरम होऊ द्यावे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू पिळावा. आणि तो लिंबू पिळलेली साल त्या पाण्यातच टाकावे.

 

त्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यावी. त्यानंतर आपली चांदीची जी काही दागिने असतील की त्यामध्ये टाकावी. पाच ते दहा मिनिटे त्यांना चांगला प्रकारे मंद आचेवर शिजवावे. दहा मिनिटानंतरच तुम्हाला जाणवेल की आपली चांदीचे दागिने बऱ्यापैकी स्वच्छ झालेले आहेत. त्यानंतर एका बाऊलमध्ये जे काही पाणी आपण उकळत ठेवलेले होते ते पाणी काढून घ्यावे व त्यातील दागिने काढावे.

 

त्यानंतर एक दात घासायचा ब्रश साह्याने त्या पाण्याचा थोडा थोडा वापर करत चांगल्या प्रकारे स्वच्छ घासून द्यावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ते सर्व दागिने धुऊन घ्यावे. नक्कीच तुम्हाला दिसून येईल की आपली सर्व दागिने अगदी स्वच्छ व लखलखीत झालेले आहेत.

 

अशाप्रकारे आपला चांदीची दागिने आपण घरच्या घरी घरच्या वस्तूंचा वापर करून अगदी स्वच्छ व लखलखित नव्या सारखी करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *