नवरा बायकोच्या नात्यामध्ये तिसरी व्यक्ती येऊ देऊ नका, नाहीतर… प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्यासाठी महत्वपूर्ण माहिती ..!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येक आई-वडिलांना असं वाटत असते की जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही ती आपल्या मुलांना मिळावी. त्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. धडपडत असतात. जीवनामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या नाहीत यासाठी आपण खूप तरसलो आहोत तर गोष्टीला आपली मुले तरसू नयेत असे प्रत्येकांच्या आई वडिलांचे स्वप्न असतं आणि त्यासाठीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो.

 

परंतु जीवनामध्ये त्या गोष्टी काही कारणाने पूर्ण होऊ शकत नाही आणि यामुळे त्या आई-वडिलांची चिडचिड होऊ लागते आणि त्यामुळे घरातील वातावरण दूषित व अशांत होऊ लागतं. खरं तर मुलांना पैसा कपडा यापेक्षा प्रेमाने आपुलकीची गरज असते. त्यातूनच ते आपला आदर्श घेत असतात. मुले आपला आई-वडिलांचा आदर्श घेत असतो. म्हणून पण सतत प्रेमाने वागले पाहिजे आणि जी मुले आई वडिलांचा आदर्श घेत असतात ती जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होत असतात. यासाठीच आज आपण काही सुंदर सुविचार जाणून घेणार आहेत.

 

स्वतःसाठी सुंदर घर तयार करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. आणि एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते.

प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो. जगातलं कटु सत्य हे आहे, की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जात असतो.

ज्ञानी किवा अज्ञानी माणसाला समजावून सांगता येते परंतु गर्विष्ठ माणसाला फक्त वेळच समजावून सांगू शकत असते.

काही माणसे पिपळाच्या पानासारखी असतात. जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात हळूवारपणे जपून ठेवाविशी वाटत असतात.

“विचार” हा पाण्यासारखा असतो जर तुम्ही त्यात घाण मिसळली तर तो नाला बनेल आणि जर त्यात सुगंध मिसळला तर ते गंगाजल बनेल.!

वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही… किमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करावी लागते… वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळतं.. जपलं असतं तर संपलं नसतं, मग ती संपत्ती असो किवा नाती…!

जो दुसऱ्याच्या मनाचा विचार करून, त्याला खूष ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो नेहमीच खूष असतो.. जो माणूस एखाद्याला, संकटात आणण्यासाठी पुढाकार घेतो, तेव्हा त्याचे असलेले चांगले कर्म परमेश्वर शून्य करून टाकत असतो. मात्र संकटात सापडलेल्यांना जो मदत करतो, त्याला परमेश्वर कोणत्याही रूपाने मदत करण्यासाठी घाऊन जात असतो..

स्वभावात ढोंग आणि मनात रोग कधीच नसावा कारण सभावतील ढोंगीपणा एक ना एक दिवस उघडकीस येत असतो आणि माणसाच्या मनातच रोग असेल तर तो कधीच बरा होत नाही.

फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळत असतो. माणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जात असते.. चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही ऊसासारखी असते, तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, किवा ठेचून बारीक बारीक करा तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल..

ज्याप्रमाणे फुलाला पाण्याचा ओलावा मिळाला तरच ते बहरते… त्याप्रमाणे कोणत्याही नात्याला मायेचा ओलावा मिळाला तरच ते बहरते.

जगाकडून जास्त अपेक्षा करू नका, जग तुमच्या बरोबर असेल किंवा नसेल, तुम्ही स्वतःशी एकरूप रहा, स्वतःची संगत सोडली, की जगात एकटे असाल.

चुकीच्या थाटात कधीच राहू नका कारण वेळ कधी कानफटात देईल हे सांगता येत नाही.

तुमच्या फालतू विनोदावर हसणारी तसेच तुमच्या प्रत्येक बोलण्याला दाद देणारी व्यक्ती काहीतरी स्वार्थ ठेवून तुमच्याजवळ आलेली असते आणि विश्वास घात करणारी नक्की असते.

झाडासारखे जगा, कोणी कितीही घाव घातलं तरी त्यांनाही मायेची सावली द्या.!

स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात झाली की आपल्या प्रगतीलाही सुरुवात होत असते.

आपलं माणूस आपल्याशी प्रामाणिक आहे या भ्रमातच माणसाचं आयुष्य निघून जात असतं.

तोंडावर स्पष्ट बोलणारी कधी घोका देत नाहीत, घाबरायचे तर त्यांना घाबरा जे तोंडावर गोड बोलून मागून वार करत असतात..!

नवरा बायकोच्या नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला महत्त्व दिलं गेलं की संसारात विश्वास संपला म्हणून समजावा मग तिसऱ्या व्यक्तिस महत्व नवरा देवो किवा बायको देवो म्हणून दोघात तिसरा नसावा, एकमेकांवर विश्वास असावा!

खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे हे माहिती नसतं पण खोटं बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते शंभर टक्के माहित असतं.

प्रेम हे दोन जीवांचं नातं असतं दोघांनी ते नातं समजून घ्यायचं असतं, छोट्याशा कारणाने कधी रुसायचं नसतं कारण प्रेम जिवनात खुप कमी नाशिबवानांना मिळत असतं..!

 

अशा प्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *