नवरात्रीच्या ९ दिवसात महिलांनी चुकूनही करू नका हि ७ कामे…. अवश्य पाळा हे नियम…. तरच व्रताचे फळ मिळेल……!!

Uncategorized

मित्रांनो, गणेशोत्सवानंतर आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. १० दिवस चालणारा हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा होतो. कोलकत्त्यात या सणाला अत्यंत महत्त्व आहे. तर देशभरातही अनेक ठिकाणी दुर्गा देवींचे पांडाल उभे असतात. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यात घटस्थापना करून हा सण साजरा केला जातो. घरोघरी घट बसवून त्यातील मातीत अनेक बिज पेरले जातात. ते सगळे बिज कोवळ्या कोंबांनी देवघरातील त्या घटात जन्म घेतात.

 

हेच देवीच्या शक्तीचे प्रतिक माणून त्याचे पूजन केले जाते.नवरात्रीचा सण वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये शारदीय नवरात्रीचा सण हा सणाचा सण आहे. अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दरम्यान दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. घरात घटस्थापना केली जाते, अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. 9 दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला दहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या 9 दिवसांसाठी शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे.

 

अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकांमुळे देवी नाराज होऊ शकते. त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख-समृद्धीने भरून टाकते. नवरात्र म्हणजे देवीचा जागर, शक्तीची पूजा. या पूजेसाठी संयम, जिद्द आणि मनःशांती आवश्यक असते. देवीची पूजा करताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. त्यासोबत व्रत आणि संयमही असायला हवा. शारदीय नवरात्र आजपासून म्हणजेच 3 ऑक्टोंबर पासून 9 दिवस असणार आहे.

 

या उत्सवात दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यामुळे दुर्गा पूजा म्हणून नवरात्राची वेगळी ओळख आहे. पूजा केल्यानं मन प्रसन्न आणि शांत राहतं. त्याचसोबत सकरात्मक ऊर्जा या दिवसांमध्ये मिळते. सुख-समृद्धी धन आणि मनाची शांती प्राप्त करण्यासाठी मंदिरात अथवा घरामध्ये दुर्गा देवीची पूजा करून तिला प्रसन्न केलं जातं. घटस्थापने दिवशी घरी कलश आणि नारळ ठेवून त्याची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी उपवासही केला जातो. घरात देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण राहातं.

 

एवढंच नाही तर काहीजण नऊ दिवस पायामध्ये चप्पलही घालत नाहीत. दरम्यान, दुर्गा देवीचा उपवास करत असताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. दुर्गेची पूजा करताना कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवं हे आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

नवरात्रात मांसाहार करू नये. याशिवाय लसूण आणि कांदा खाऊ नये. लसूण आणि कांद्याचा वापर नैवेद्यातील जेवणात करू नये. मद्य सेवेन टाळावं. नवरात्रामध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याच्या चपला किंवा वस्तू वापरू नयेत. बेल्ट, पर्स, बॅग, चप्पल-शूज यासरख्या इतर गोष्टी वापरणं शक्यतो टाळावं. नवरात्रात व्रत करणाऱ्या व्यक्तींनी अन्न आणि मीठा खाऊ नये. काही ठिकाणी सेंधव-काळ्या मिळाचा वापर केला जातो. फळ खावीत.

 

दूर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता करावी. पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्य़ा असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात असा समज असल्यानं आरती केली जाते.आरती करतान धूप लावावा. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहातं. घरातील किडे, डास पळून जातात. अगरबत्ती केमिकलपासून तयार केली जात असल्यानं शरीरासाठी हानिकारक असते. नवरात्रामध्ये दूर्गा देवीची जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती वापरू नये. नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

 

जे लोक नवरात्रात उपवास किंवा व्रत पाळतात त्यांनी दिवसा झोपू नये. त्यामुळे घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होतं. व्रत करताना पूजा आणि आरती एकाचवेळी पूर्ण करा. खंड पडू देऊ नका किंवा टप्प्या टप्प्याने करू नका. त्य़ामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा परिणाम होणार नाही. दिवसांमध्ये नखं कापणं, केस कापणे किंवा दाढी करू नये. असाही एक समज आहे. व्रत करणाऱ्यांनी स्वच्छ धुतलेले कपडे रोज परिधान करून पूजा करावी. रोज स्नान करावे आणि घर-परिसारत स्वच्छता ठेवावी. यामुळे लक्ष्मी प्रसन्न रहाते.

 

नवरात्रीत चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये. तसेच चामड्याच्या वस्तू ही विकत घेऊ नयेत. चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात. त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनविल्या जातात. नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत पवित्रता आणि सात्त्विकतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या 9 दिवसांत मांसाहार खाऊ नका, घरी आणू नका. नवरात्रीत लसूण-कांदा खाण्यासही मनाई आहे.

 

नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये. या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते. त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनवू नका. या 9 दिवसांत लिंबाचे लोणचे खाणे टाळा. या सगळ्या गोष्टी पूर्वापारंपार चालत आल्या आहेत.त्या पाळाव्या किंवा नाही किंवा त्याबाबत अनेक मतमतांतरही आहेत. जो मनोभावे पूजा करतो तो आपल्या परीनं हे व्रत पाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र देवीची मनोभावे पूजा करणं हेही एक व्रत आहेच.

 

अशाप्रकारे नवरात्र मध्ये कोणत्या गोष्टी करू नये त्याची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *