तुमच्या प्रेमात तडपणाऱ्या स्त्रीचे हे असतात शारीरिक इशारे पुरुषांनी नक्की बघा ….!!!

Uncategorized

एखादी मुलगी आवडणे ही सामान्य गोष्ट आहे पण त्या मुलीला सुद्धा तुम्ही आवडत असाल तर मात्र ही असामान्य गोष्ट आहे आणि मंडळी यालाच तर प्रेम म्हणतात. पण सगळेच जण एवढे लकी नसतात. अनेक मुलांना मनापासुन एखादी मुलगी आवडत असते. पण तिला आपण आवडतो का हे त्यांना माहित नसते. काही जण दबंग असतात जे बिनधास्त जाऊन त्या मुलीपुढे प्रेमाची कबुली देऊन तिचा होकार मिळवतात.

 

अर्थात सगळ्यांनाच हे शक्य नसते. त्यामुळे ती मुलगी काही हिंट देते का किंवा तिला आपल्यात इंटरेस्ट आहे का हे जाणून घेण्यासाठी अशी मुले उत्सुक असतात आणि अशाच मुलांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास लेख, ज्यात आम्ही शेअर करतोय काही हिंट्स ज्यातून तुम्हाला कळून चुकेल की तिला देखील तुमच्याबद्दल फिलिंग आहे.

 

ती स्वतःबद्दलची प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत असेल, तसेच तिच्या आवडीनिवडी, तिला होणारा त्रास, तिला काय हवे आहे, अशा गोष्टी देखील ती सांगत असेल तर समजून जा बॉस की तिच्या मनात तुमच्यासाठी स्पेशल स्थान आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्या कोणत्या मुलीशी बोलता, वा जास्त वेळ घालवता तेव्हा जर तिच्या बोलण्यात त्याबाबत हेवा वाटत असेल वा ती तुम्हाला टोमणे मारत असेल तर नक्कीच तिला ही गोष्ट सहन होत नसते आणि सहन त्याच व्यक्तीला होत नाही जिच्या मनात प्रेम असते.

 

जर ती तुम्हाला सतत मेसेज करत असेल आणि कॉल करत असेल, दिवसातून नेकदा तुमची आठवण काढत असेल, छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलायला येत असेल तर नक्कीच तिच्या मनात तुमच्या विषयी फिलिंग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काम असो व कोणतेही संकट असो ती जर नेहमी तुमच्या सोबत असेल व तुम्हाला सपोर्ट करत असेल, तसचं सगळ्यांना तुम्ही चुकीचे वाटत असताना ती जर ठामपणे तुमचीच बाजू घेत असेल तर याचा अर्थ तुम्ही तिला आवडता आणि तिचा तुमच्यावर जीव आहे.

 

एखाद्या खास प्रसंगी, जसे की तुम्ही देखील छान तयार झाले असतात आणि ती देखील नटलेली असते अशावेळी तुम्ही तिची स्तुती केली आणि तिच्या चेहऱ्यावर लळी आली किंवा ती लाजली तर समजून जा की तुमच्या स्तुती साठीच ती आतुर होती. जर एखादी मुलगी सतत तुमच्या मागे मागे करत असेल किंवा अवतीभवती घुटमळत असेल आणि प्रत्येक गोष्टीत विनाकारण तुमची मदत मागत असेल तर याचा अर्थ तिला तुमच्यामध्ये रस आहे. तुम्ही अस्वस्थ असाल किंवा डिप्रेस असाल तर ती कोणाचीही पर्वा न करता थेट तुम्हाला आधार द्यायला येते. हे तुमच्यावर तिचं प्रेम आहे याचं सर्वात मोठं लक्षण आहे.

 

त्याचप्रमाणे काही प्रकरणांमध्ये शारीरिक ओढ देखील दिसून येते. यात तिला चुकीचं समजण्याची किंवा घाणेरडी कल्पना करण्याची अजिबात गरज नाही. जर ती सतत तुमच्या जवळ येत असेल, तुम्हाला मिठी मार असेल, तुमचा हात धरत असेल, एकटम बघत बसत असेल तर या सर्व प्रेमाचीच निशाणी आहेत. पण या गोष्टी जास्त फ्री वागण्याच्या नादात कधी कधी मैत्रीमध्ये देखील घडतात. याचा विचार करून त्या मुलीशी चर्चा करून मगच निर्णय घ्या. नाहीतर मैत्री तुटू शकते.

 

अशा प्रकारे तुमच्या प्रेमात तडपनारी स्त्री ओळखण्यासाठी हे इशारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *