मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये काही उतार चढा येत आसतात आणि या उतार चढावा मध्ये काही वाईट वृत्तीची लोक असतात. जी आपण करत असलेली प्रगती त्यांना बघवत नाही आणि त्यामुळे ते आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतो. अशा लोकांसाठी आपण कशी वागणूक दिली पाहिजे? ज्यामुळे त्यांची ही कृती ते परत आपल्याबरोबर करणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांची लायकी समजेल. यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेणार आहे. ज्यामुळे वाईट लोकांना आपण त्यांना त्यांची लायकी दाखवू शकतो.
1. वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या बरोबर कितीही चांगले वागा, पण कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडंच. म्हणून यांच्याकडे कधीही लक्ष न दिलेलंच बरं.
2. हे वाईट लोक भुंकणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असतात म्हणून यांना दगड न मारता बिस्कीट खायला देऊन पुढे निघून जायचे.
3. नेहमी लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही या लोकांना कमी भाव द्याल किंवा यांच्याकडे दुर्लक्ष कराल तेवढांच त्यांचा माज तिथल्या तिथे उतरेल.
4. या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमजोर दिसू देवू नका कारण एकदा का तुमची कमजोरी यांना कळाली की ते त्याचा फायदा नेहमी घेतात.
5. या लोकांचा अहंकार मोडून पाडायचा असेल तर फक्त एकच मंत्र आहे तो म्हणजे “ओम दुर्लक्षाय नमः ”
6. हे लोक तुमच्या एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून यांच्या समोर आपला माज एवढ्या वरचढ ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील.
7. या वाईट लोकांना सल्ले देणे पूर्णपणे टाळा कारण गाढवासमोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता अशी स्तिथी या मूर्ख लोकांसमोर होते.
8. या लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन झालं नाही की ते इतर लोकांना तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करतात पण यावर तुमची कोणतीही प्रतिक्रिया नसणं हे त्या लोकांसाठी त्याची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे.
9. तुमच्या बरोबर कधी भांडण करता येईल हेच या लोकांचं टार्गेट असतं. हे लोक आपल्याशी भांडताना आपल्याला त्यांच्या पातळीवर नेतात आणि आपल्यालाही मूर्ख करतात म्हणून या लोकांच्या नादी लागून आणि यांच्याशी वाद करून यांना महत्व देण्यापेक्षा आपण आपला मार्ग बदललेलाच उत्तम.
10. ह्या लोकांना त्यांच्या इज्जतीची किंवा त्यांचे ह्या समाजात काय महत्त्व आहे किंवा नाही याचा जराही विचार नसतो म्हणून आपण फक्त शांत राहायचं कारण हे लोक स्वतःच स्वतःची लायकी पूर्ण जगाला दाखवत असतात.
११. तुम्ही कोणताही चांगलं काम करत असताना वाईट लोकं तुम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी त्या कामात काहीतरी खुसपट काढतील अशा लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं काम चालूच ठेवायचं कामाचे परिणाम त्यांना काही कालावधीतच दिसतील.
१२. हे लोक आपल्या सुखामुळे कमी परंतु आपल्या दुःखामुळे जास्त आनंदित होतात म्हणून यांना आपली दुःखं कधीच कळू द्यायची नाहीत यांच्यासमोर नेहमी हसत मुखानेच जायचं हे लोक बुचकळ्यात पडले पाहिजेत की याला कशाचा एवढा आनंद असतो.
१३. ही वाईट माणसं आपल्याशी त्यांना जेव्हा गरज असते तेव्हाच बोलतात इतर वेळी आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत मात्र आपल्याविषयी कटकारस्थाने चालूच असतात. आपणही त्यांच्याशी कमीत कमी बोलायचं, एका मर्यादेत बोलायचं हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं. नाहीतर ही लोकं सतत आपल्याला दुःखी ठेवतील, नकारात्मक ऊर्जा देतील.
१४. आपल्या गालावर बसलेल्या मच्छराला मारणं म्हणजे स्वतःला मारण्यासारखं आहे थोडक्यात या माणसांच्या नादी लागणं म्हणजे स्वतःची बदनामी करण्यासारखं आहे म्हणून या माणसांपासून दूर राहा.
या गोष्टी जर आपण केलं तर नक्कीच वाईट लोकांना त्यांची लायकी दाखवता येईल.