डोळ्यात पाणी आलं प्रा. नितीन बानुगडे पाटील व्याख्यान मनाला भिडणारा प्रसंग आई काय असते….!!

Uncategorized

मित्रांनो, असे म्हटले जाते स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आई ही आईच असते. आपल्या बाळासाठी ती कोणतेही कष्ट सुजण्यासाठी तयार असते. आपल्या मुलाला कसलाही प्रकारची शिक्षा झाली तर तिचा डोळ्यातून पाहिला अश्रू येतात. आपला मुलाने जर एखादी गोष्ट मागितली तर त्या मुलाला ती गोष्ट कशी दिली जाईल असं तिची तिची धडपड असते. आजच्या लेखांमध्ये आपण एका आईची व एका मुलाची हृदयस्पर्शी कथा जाणून घेणार आहोत. जी नितीन बानूगडे पाटील यांनी सांगितलेली आहे.

 

एकदा एका मुलाने आपल्याला आईला सांगितलं की मला जत्रेत जायचं आहे. आता जत्रेत जायचं म्हणलं तर मुलासाठी पैसे हे द्यावे लागतील. पण त्या आईकडे परिस्थिती गरीब असल्यामुळे पैसे नव्हते. आईला प्रश्न पडला की आपला मुलगा जत्रेत जायचं म्हणतोय पण त्याच्याकडे थोडं का हो ना पैसे आपल्याला द्यावे लागतील. यासाठी तिला काय करावे हे कळना. ती घरी गेली घरातील खुरपे काढले आणि शेतामध्ये काम करण्यासाठी गेली. दिवसभर कष्ट करून तिला काही पैसे मिळाले व ती घरी परत आली.

 

तीला असे वाटले की आपल्या मुलाला देण्यासाठी आपल्याकडे थोडं पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती. मुलगा देखील शाळेतून घरी परत आला व आईला म्हणाला, ‘आई मी सकाळी लवकर जत्रेला जाणार आहे. लवकर झोपून लवकर उठतो.’ त्याप्रमाणे तो मुलगा रात्री लवकर झोपी गेला. सकाळी तो लवकर उठला व त्यांनी आईला देखील उठवलं. ‘आई लवकर उठ! मला जत्रेत जायचं आहे.’

 

मुलगा एकीकडे आंघोळीला गेला. तोवर आईने चुलीवर भाकरी केली व निखाऱ्यावर दूध तापत ठेवले. तोवर मुलगा आंघोळ करून परत आला. त्याची गडबड लागली होती. कारण त्याला जत्रेत जायचे होते. ‘आई मला लवकर वाढ. मला जत्रेत जायचं आहे. आवर लवकर!’ असा तो म्हणाला. आईने देखील गडबडीने एक ताट घेऊन त्यात भाकरी टाकली. तोवर याची गडबड पुन्हा चालू झाली. ‘आई लवकर ग लवकर!’

 

Lआईला काय सुधारणा झाल. दुधाचे भांडे उचलण्यासाठी ती काहीतरी शोधत होती. परंतु तिला तिथे काहीच दिसत नव्हते. मात्र मुलाची गडबड ही चालतच होती. ‘आई लवकर, लवकर वाढ’ करून तिला गडबडीमध्ये काय सूचनाच झाले व ती त्या गरम निखाऱ्यावरच्या भांड्याला हात लावला. हात लावताच चरकन आवाज झाला. तिला बोटांना भाजले. तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येऊ लागले. तिने एकदम हात बाजूला घेतला.

 

तोवर त्याच्या मुलाची गडबड ही चालूच होती. ‘आई लवकर!’ इकडचा तिकडचा विचार न करता पुन्हा तिने त्या तापलेल्या भांड्याला आपली बोटे लावली व तसाच कळ सहन करत त्या मुलाला ताटामध्ये दूध ओतले. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्या मुलांनी पाहिले व निमूदपणे त्याने दूध भाकरी खाल्ली. त्याची भाकरी खाऊन झाल्यानंतर आईने मुलाला आपल्या जवळ घेतले व आपल्या जवळील दहा रुपयाची नोट दिली आणि मुलाला म्हणाली, ‘खूप वेळ भटकत बसू नको. संध्याकाळी होण्याच्या आत घरी ये. हे दहा रुपये आणि काहीतरी खा उपाशी राहू नको!’ असे म्हटले.

 

तो मुलगा जत्रेत गेला. दिवसभर त्याने जत्रेमध्ये मजा केली. सर्व काही पाहिले. संध्याकाळ झाली आई मुलाची वाट पाहत होती. तेवढ्यात तीला मुलगा दिसला व तिने आपल्या मुलाला आपला कुशीत घेतले व ते विचारू लागली, ‘काय काय पाहिले जत्रेमध्ये? दिलेला पैशांचे तू काय केले? काय खाल्ले की नाही?’ त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘आई तू तुझे डोळे बंद कर मी तुला काय काय पैशांची आणले ते दाखवतो!’ आई म्हणाली, ‘काय केले ते तर काय आणले ते तर दाखव!’

 

मुलगा म्हणाला, ‘दाखवतो ग! तू आधी डोळे बंद कर.’ आईने डोळे बंद केले व हात पुढे करण्यासाठी मुलाने सांगितले. त्याने हातावर जत्रेतून आणलेली दहा रुपयाची सांची ठेवली. आईने डोळे उघडल्यावर आईचे ऊर भरून आले. तिने तिच्या मुलाला घट्ट मिठी मारली व म्हणाली, ‘माझी कुस धन्य झाली! की तुझ्यासारखा मुला मुलगा मला मिळाला. दिवसभर तू उपाशी राहून माझा विचार करून माझ्यासाठी सांची अनलीस!’ आई रडू लागली.

 

अशाप्रकारे ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. दिवसभर उपाशी राहून आपल्या आईला लागलेला चटका चा विचार करून तिच्यासाठी एक वस्तू आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *