चांदी सोन्याचे दागिने वस्तू हातही न लावता होतील एकदम चमकदार परत कधी पॉलीशची गरज पडणार नाही…!!

Uncategorized

मित्रांनो, चांदी हा असा धातू आहे, ज्याची चमक कालांतरानं कमी होऊ लागते. विविध प्रकारचे दागिने, भांडी, मूर्ती इत्यादी वस्तू चांदीपासून बनवल्या जातात. पण चांदीची वस्तू जोपर्यंत वापरात राहते, तोपर्यंतच ती चांगली राहते. परंतु जर तुम्ही काही काळ ती तशीच ठेवली तर हळूहळू त्याची चमक कमी होऊन ती काळी होऊ लागते. मात्र, ती काळी झाल्यामुळं खराब होत नाही किंवा त्याचं मूल्य गमावत नाही. तर, हा धुळीचा आणि हवेचा धातूवर होणारा परिणाम आहे.

 

 

पण चांदीच्या काळ्या पडलेल्या वस्तू तशाच वापरणं चांगलं वाटत नाही. त्या पुन्हा स्वच्छ कराव्या लागतात. तुमच्या घरातील कोणताही चांदीचा दागिना किंवा वस्तू काळी पडली असेल तर, तुम्हाला ती साफ करण्यासाठी सोनाराकडे जाण्याची गरज नाही. काही घरगुती उपाय करून तुम्ही या वस्तू सहज चमकवू शकता. म्हणूनच आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपण सोन्या-चांदीचे दागिने चमकू शकतो.

 

यासाठी आपल्याला प्रथम एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण वापरत असलेले भांड्याचे जेल किंवा धुण्याचा सोडा थोडासा टाकावा आणि यामध्ये आपल्या घरातील सर्व चांदीची भांडी ठेवावी. पाच ते दहा मिनिटं ही भांडी तशीच ठेवावेत. त्यानंतर ही भांडी पाण्यातून बाहेर काढावी व त्यांना लिंबू आणि सोड्याने चांगल्या प्रकारे चोळून घ्यावे. चोळून घेतल्यानंतर ते पाच मिनिटं तसंच राहू द्यावे. त्यानंतर त्यांना पाण्याने धुऊन घ्यावी. धुतल्यानंतर आपला घरात असलेली कोलगेट पेस्ट किंवा पावडर घ्यायचे आहे आणि ही पावडर एखाद्या स्क्रबरच्या साह्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने आपल्याला संपूर्ण भांड्यांवरती लावून घ्यायचे आहे.

 

आणि व्यवस्थित रित्या ते घासून घ्यायचे आहेत. घासत असतानाच काळे पडलेले डाग निघून गेल्याचे तुम्हाला दिसेल. ही पावडर सर्व ठिकाणी लावल्यानंतर एक पाच ते दहा मिनिटे आपल्याला ते तसेच ठेवायचे आहे. पाच ते दहा मिनिटानंतर पुन्हा एकदा आपल्याला ते व्यवस्थित रित्या घासून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. धुटल्यानंतरच तुम्हाला दिसून येईल की आपली चांदीची भांडी नवीन लखलखीत झालेले आहेत.

 

धुतलेली भांडी लगेचच एखाद्या मूळ सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यावेत व त्यांना कोरडे करून घ्यावे. अशाप्रकारे आपण आपली चांदीची भांडी स्वच्छ करू शकतो. चांदीप्रमाणे सोन्याचे दागिने देखील आपल्याला घरच्या घरी स्वच्छ करता येतात. यासाठी आपल्याला एखादा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये रिटा घालायचे आहेत.

 

या रिटा आयुर्वेदिक दुकानांमध्ये आपल्याला मिळतात किंवा त्या रिटा पावडर देखील आपल्याला मिळतात. ही पावडर किंवा रिटा या पाण्यामध्ये घालावी व ते पाणी व्यवस्थित रित्या उकळू द्यावे. उकळल्यानंतर त्यामध्ये आपले सोन्याचे दागिने घालावेत आणि पाच ते दहा मिनिटे आपल्याला ते पाणी तसंच ठेवावे लागेल. पाच ते दहा मिनिटानंतर एखादा लिंबू घेऊन आपल्या दागिन्यांवरती त्या लिंबाचा रस घासावा. त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने आपले दागिने धुऊन घ्यावे. नक्कीच तुमचे दागिने देखील स्वच्छ व लखलखन झालेले दिसतील.

 

अशाप्रकारे या घरगुती उपायांनी आपण आपली सोन्या-चांदीचे दागिने व भांडी घरीच चमकू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *