घरात दळिद्रता घेऊन येतात या 9 सवयी…!!

Uncategorized

मित्रांनो, घरात दरिद्रता आणणाऱ्या या नऊ सवयींबद्दल घरातील मोठे वडीलधारी मंडळी अनेक वेळा सूचना देतात किंवा चर्चा करतात. अनेकदा मुलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात, पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतः सोबत दरिद्रता आणि गरिबी घरात आणतात.जर तुम्हीही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात, तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही.

 

जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते, तसेच काही वाईट सवयी असतात, ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते.कारण या वाईट सवयींमुळे माता लक्ष्मी नाराज होतात. अश्या कोणत्या सवयी आहेत, ज्या वडीलधारी मंडळीही करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात? त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही, याचीच माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

नंबर एकः तुम्ही कधीही स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नयेत. जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत. अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तसेच ठेवतात. पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका. यामुळे राहु-केतूचा अपशकून तुमच्या घरावर पडतो. याशिवाय, जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका. असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता. जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते.

 

नंबर 2: आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काहीही काम करु लागतात. टीव्ही पाहत असताना पलंगावरच जेवण करू लागतात. पण ही सवय खूप वाईट आहे. यामुळे घरातील लक्ष्मी रुसते. वास्तुशास्त्रानुसार, पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार, पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुख-शांती बिघडते. तसेच, अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात. यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते, आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही.

 

नंबर तीनः शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे. पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात, जे खूप अपशकुनी मानले गेले आहे. म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात. गोधूलि वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे. या वेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे. याशिवाय, ज्या पलंगावर तुम्ही झोपता, तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका. पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो. सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा. खूप दिवस एकच जादर पलंगावर ठेवू नका. घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते. मय

 

नंबर चारः दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा.पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल, तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका. असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते, मानसिक तणाव कायम राहतो . याशिवाय, हिंदू धर्मात पूजा, उपवास आणि नियमांना खूप महत्त्व दिले गेले आहे पण जर तुम्ही पूजा-उपवास करत नाही,तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात, ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागते.

 

याशिवाय, कधीही एका हाताने चंदन घास नये. असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते. असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावतात, आणि हे त्यांच्या अपमानासारखेच असते. त्यामुळे तुम्हाला पैशांची चणचण भासु शकते. चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये. हे शुभ मानले जात नाही. चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी- देवतांना अर्पण करा. तसेच, रात्रीच्या वेळी पूजाघर कधीही रिकामे ठेवू नका. देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजाघराच्या दरवाजावर पडदा लावा. यामुळे मूर्ती दोष होणार नाही.

 

नंबर पाचः माया वास्तुशास्त्रानुसार, रात्री कपडे धुणे टाळावे. असे केल्याने घरात नकारात्म निर्माण होते, कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते. म्हणूनच, रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते. याशिवाय, अनेक लोक रात्री झाडू लावत असल्याचे पाहिले आहे. वास्तुशास्त्रात् संध्याकाळीनंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे. शास्त्रांनुसार, झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळीनंतर झाडू लावतो, माता लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट होतात, आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात. तसेच, अनेक लोक स्नान इत्यादी केल्यानंतर आपला बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामात गुंतून जातात . ही सवय त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करते. याशिवाय, घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद ठेवले पाहिजे. त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

 

नंबर सहाः नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते. नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बळ होतो. अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते. तसेच काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल टाकतात. चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते. विशेषतः, चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये. यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते. चप्पलसाठी नेहमी एक रॅक बनवून त्या त्यात ठेवाव्यात. याशिवाय, जुन्या डायऱ्या, ज्या तुम्ही वापरत नाही, त्या घरात ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार, जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो. तसेच, घरात जुने वृत्तपत्रे साठवून ठेवू नयेत. ती सुद्धा घरात दरिद्रतेचे कारण बनतात. ज्यामुळे कुटुंबात अशांतीच वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुने वृत्तपत्र खूप दिवसांपासून साठवले गेले असेल, तर ते आजच बाहेर काढा किंवा कबाडवाल्याकडे द्या.

 

नंबर सातः ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत. असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. संध्याकाळीनंतर दूध, दही, आणि मीठ यांसारख्या वस्तूंचे दान करू नये. या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते. ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो, त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात. त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही.

 

नंबर आठः घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तुशी खूप मोठा संबंध आहे. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल, तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे. ते बंद पडल्यास त्वरित दुरुस्त करून लावा किंवा काढून टाका.घरात कोणतेही बंद किंवा खराब घड्याळ असेल, तर ते काढून टाका किंवा दुरुस्त करून एखाद्या भिंतीवर लावा. खराब घड्याळ ठेवल्यामुळे तुमचा काळ थांबतो आणि माता लक्ष्मीचे आगमनही टळते. याशिवाय, वीजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.त्यामुळे, खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा. वीजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात, आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होता, घरात कधीही जुने, खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवू नये. या खराब कुलपांमुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात. ही कुलपे त्वरित काढून टाका.

 

नंबर नऊः स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा अस्वच्छ भांडी ठेवू नका. नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा. यामुळे घरात सुख-शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर मिळतो. पुराणांमध्ये सांगितले आहे की, चुली रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचा वास होतो. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही. स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे. येथे देवी-देवतांचे वास्तव्य असते.

 

अशाप्रकारे घरात दळिद्रता घेऊन येतात या 9 सवयी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *