गोम, गांडूळ सारखे किडे टॉयलेट बाथरूम मध्ये सारखे निघतात ? मग हे ५ उपाय नक्की करून पहा तुमचे सर्व प्रॉब्लेम नाहीसे होतील …..!!!

Uncategorized

मित्रांनो, पावसाळात तुमच्याकडेही स्वच्छतेला सुरुवात झाली असेल ना? तुम्ही चाळ, बिल्डिंगचा तळमजला, किंवा बंगल्यातही रहात असाल तर पावसाळ्यात घरात येणारे किडे म्हणजे डोकेदुखी वाढवू शकतात. या किड्यांमुळे तुमच्या बाथरूमचा लुक बिघडतो. तर काहीवेळा या प्राण्यांच्या मार्फत अनेक आजारांचे विषाणू सुद्धा पसरत असतात, पावसाळ्यातील काही प्राणी जसे की खूप पाय असणारी गोम शरीराला चावल्यास मोठा अपाय होऊ शकतो.

 

तुमचे त्रास व कष्ट वाचवण्यासाठी आपण आज अगदी सोपे व स्वस्त उपाय पाहणार आहोत. अवघ्या १० ते २० रुपयात तुम्हीही हे उपाय करून गांडूळ, गोम, माश्या, झुरळ यांसारख्या किड्यांपासून सुटका मिळवू शकता. पावसाळा ऋतू आला कि जमिनीखाली असलेले अनेक कीटक वर येतात. यात गांढूळ, घोण असे सरपटणारे प्राणी आणि अनेक प्रकारच्या कीटकांचा समावेश असतो. पावसाळा सुरु झाला की हे कीटक बाथरूममध्ये येतात आणि लक्ष न दिल्यास घरातील इतर खोलींमध्ये देखील त्यांचा शिरकाव होतो. यामुळे पावसाळ्यात घरात अस्वच्छता पसरते आणि कीटकांची किळस देखील वाटते. तेव्हा या कीटक आणि प्राण्यांपासून कशी सुटका मिळवायची यासाठी काही टिप्स आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

गांडुळांपासून सुटका मिळवण्यासाठी बाथरूम नेहमी स्वच्छ करत राहा. अस्वच्छ बाथरूममध्ये गोम – गांडूळ आपली अंडी घालतात. ज्यामुळे यांचा वावर वाढतो. साचलेल्या पाण्यात किंवा घाणीच्या ठिकाणी गांडूळ जास्त येतात. गांडूळ – गोमपासून सुटका हवी असेल, तर बाथरूमचा वापर झाल्यानंतर नेहमी क्लिन करा.

 

जाड मीठ/ खडा मीठ. बाथरूममध्ये व टॉयलेट मध्ये पांढरे जाड मीठ म्हणजेच खड्याचे मीठ पसरवून ठेवा. मीठातील क्षार या किड्यांना मारून टाकते. त्यामुळे तुमच्या घरांमध्ये गोम किंवा गांडूळ येण्याची शक्यता कमी येते.

डांबर गोळ्या. बाथरूम मध्ये व घरातील नेप्थलीन बॉल म्हणजे डांबर गोळ्या पसारवून ठेवा. याचा गंध हा खूप हार्ड असल्यामुळे यामुळे देखील गांडूळ किंवा गोम आपल्या घरामध्ये येत नाही.

कडुलिंब/ पुदिन्याची पाने- गांडूळ येतात अशा ठिकाणी पुदिन्याची किंवा कडुलिंबाची किंवा दोन्ही एकत्र अशी पाने कुस्कुरून टाका.

कापूर- शक्य झाल्यास एक दिवस आड घरात कापूर जाळा. नारळाची धुरी केल्यास त्यात कडुलिंबाचा पाला घालावा.

बोरिक पावडर- बाथरूम व टॉयलेट मध्ये बोरिक पावडर व ब्लिचिंग पावडर टाकून घ्या. या पावडरचा गंध खूप उग्र असतो त्यामुळे एक दिवस आड टाकू शकता.

व्हिनेगर- प्राणी घरात येणाऱ्या ठिकाणी रात्री एक चमचा व्हिनेगर ओतावे, जेणेकरून त्या गंधाने प्राणी कमी होतील.

 

याशिवाय, रोज घर फिनाईलने पुसून काढण्याचा सल्ला दिला जातो, लादी पुसल्यावर कोरडी सुद्धा करा. ओल्या ठिकाणी गांडूळ, माशा अधिक येतात. जर घरात छोटे मोठे भगदाड पडले असेल तर ते वेळीच बुजवा.

 

अशाप्रकारे हे काही उपाय आहेत जे केल्यामुळे आपल्या घरामध्ये कीटक येत नाहीत व त्यामुळे आपल्याला अस्वच्छता असल्यासारखे देखील वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *