आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर ह्या 53 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा? आयुष्यात कधीही आजारी पडणार नाहीत …!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या आरोग्य हे चांगले राहावे. आरोग्यामध्ये बिघाड आला की आपल्या शरीराला खूप काही सहन करावी लागते. ज्याचा परिणाम आपल्या भविष्यामध्ये होऊ शकतो. म्हणूनच आपले आरोग्य योग्य चांगली रहावे आपण कधीही आजार पडू नये यासाठी आपण आजच्या लेखातून काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

1) फ्रिजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी प्या. फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते.

2) एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते.

3) निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा. तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. सॅलेड, दही, ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा.

4) रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायांनी चालल्याने दृष्टी सुधारते.

5) सकाळी उपाशीपोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते.

6) रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो.

7) फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये.

8) दातांनी नखे कुरतडू नयेत. यामुळे नजर कमकुवत होते.

9) टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते. तसेच हे सूप डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

10) सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो.

11) रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात.

12) वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खावेत.

13) तोंड भरून अन्न खाऊ नये त्यामुळे पोटाची चरबी वाढते.

14) रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने ते मजबूत होतात.

15) दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो.

16) जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते.

17) रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते.

18) दिवसातून एक वेळा दह्याचे पाणी प्या. दह्याचे पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते.

19) पेरू खाल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते.

20) स्वतःला थोडे सामाजिक बनवा. लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला.यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल. तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल.

21) पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा. हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्लाघ्यायला विसरू नका.

22) सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते. सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते ज्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो.

23) आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरामध्ये जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते.

24) रोज केस धुतल्याने केसगळतीची समस्या निर्माण होते.

25) तात्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झालेले असले तरी त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांचावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा. जसे की शक्य झाल्यास कार कींव बाईक ऐवजी चालत जा, लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल. तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील.

26) भात फ्रिजमध्ये ठेवून जास्त दिवस खाऊ नये. त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात.

27) एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांमध्ये वेळ घालवा. यासाठी कुठेतरी तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता. शिवाय नृत्य, संगीत, गायन,स्वयंपाक किंवा इतर कोणतेही आवडते काम करू शकता. तुमच्या दैनदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा. त्रीही एकटेपणा जाणवत असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

28) आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण असते.

29) पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात.

30) जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थता जाणवणे, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांकडेही लक्ष दिले पाहिजे.

31) जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल, मात्र हळूहळू हा त्रास होत असेल तर हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता असते.

32) तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडा, रवा, पोहे, फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता.

33) जर एखाद्या स्त्रीला पोटदुखी, अपचन किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर समस्या असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधी कधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगाचे सकेत देत असतात. तो गर्भाशयाशी संबंधित किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो.

34) जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. म्हणून अन्न नेहमी हळूहळू चावून खावे.

35) संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात. मखाना हे एनर्जी बूस्टर म्हणून चांगले काम करते.

36) जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो.

37) कोल्ड्रिंक्स ऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी, आंब्याचा रस किंवा उसाचा रस इत्यादींचे सेवन करा. यांमधून शरीराला पोषक तत्व मिळतील.

38) पोट दुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. यासाठी दिवसातून एक ते दोन वेळा पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे.

39) जर तुमचे हात पाय काळे पडले असतील तर दुधामध्ये बेसन आणि हळद मिक्स करून हातापायांना लावा.

40) रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. जेवणानंतर काही वेळ फिरायला हवे. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने अन्न सहज पचते आणि शरीराचे वजन नियत्रित राहते.

41) चहाचे जास्त सेवन केल्याने दात आणि हिरड्यांवर खूप वाईट परिणाम होतो.

42) जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा.

43) जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते खूप लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात.

44) रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक पाकळी खाल्ल्याने वजन शीघ्र गतीने कमी होते.

45) ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावेत. यामुळे वजन वाढण्यास मदत होईल.

46) केळी खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता कमी होते.

47) दिवसभर कोणत्याही स्वरूपात एक चमचा दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य सुधारेल.

48) लसणाच्या पाकळ्या सोललेल्या असो किंवा तशाच असो फ्रिजमध्ये ठेवू नयेत. लसूण फ्रिजमध्ये ठेवल्याने कोण फुटू लागतात, चव कमी होते आणि औषधी गुणधर्म नष्ट होतात.

49) जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गूळ खा यामुळे तुमची एनर्जी वाढेल.

50) जास्त वेळ झोपू नये. जास्त वेळ झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते.

51) नवजात आणि 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या शरीराला जीवनसत्वांची जास्त गरज असते.नवजात बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय वेगाने होत असतो. अशा परिस्थितीत 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना काही विशेष जीवनसत्वांची नितांतगरज असते. विटामिन डी, विटामिन ए, आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड आणि विटामिन सी ही काही महत्त्वाची जीवनसत्वे आहेत जी या वयातील बालकांसाठी खूप महत्त्वाची मानली जातात. बाळासाठी यापैकी बहुतेक जीवनसत्वे आईच्या दुधातून मिळतात. परंतु विटामिन डी साठी थेट सूर्यप्रकाश आवश्यक असतो. म्हणून नवजात बालकांना दिवसातून एकदा तरी कोवळ्या सूर्यप्रकाशात घेऊन बसा.

52) लोक हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करतात. थंडीपासून बचावासाठी लोकांना गरम पाण्याने आंघोळ करणे आवडते. परंतु गरम पाण्याने आंघोळ करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो ज्यामुळे केस आणखी कोरडे पडण्याची शक्यता असते. याशिवाय केसांचे नैसर्गिक तेल देखील नष्ट होते. त्यामुळे गरम पाण्याने केस धुतल्याने ते अधिक कोरडे पडण्याची शक्यता असते. गरम पाण्याने केस सतत धुतल्याने टाळू कोरडी पडते ज्यामुळे डोक्यामध्ये खाज येण्याची आणि कोंडा होण्याची समस्या वाढते. तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस गळतीचे प्रमाण देखील वाढते.

53) स्त्रियांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानापासून बनवलेला चहा प्यावा. मासिक पाळी नियमित होईल.

54) अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस काळे आणि मुलायम होतात.

55) जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणामध्ये ओवा मिक्स करा.

 

अशाप्रकारे या काही आरोग्य विषयी गोष्ट आहे. त्याचे पालन जर आपण केले तर नक्कीच आपल्याला आयुष्यात कधीही आजार पण येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *